Well
grant:२०२१
मध्ये
निती आयोगाद्वारे प्रकाशित Multi – Dimensional Poverty Index प्रमाणे महाराष्ट्रात १४.९
टक्के कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत . त्यातच केरळमधील फक्त ०.७१ टक्के कुटुंबे
दारिद्रय रेषेखालील आहेत . याचाच अर्थ भारतातील राज्यांना दारिद्रय संपवणे शक्य
आहे . सर्व विदित आहे की , महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे . महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारावरच केला आहे
.
विहिरीसाठी अर्ज डाऊनलोड
करण्यासाठी व शासन निर्णय पाहण्यासाठी
यावर क्लिक करा
Well
grant: काळपरत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आलेला आहे .
अलीकडेच वैयक्तिक कामांमध्ये किमान ६० टक्के राशी खर्च करण्याचे निर्देश भारत
सरकारकडून प्राप्त झाले आहे . अर्थात मनरेगा फक्त रोजगार देणारी योजना नसून
विकासात भर घालणारी योजना आहे . मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने
मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे .
भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून ३,८७,५०० विहीरी खोदणे शक्य आहे .
मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध
पाण्याचा किफायतशीर वापर ( ठिबक / तुषार लावून ) केला गेल्यास मोठ्या संख्येने
कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत
केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल .
१. लाभधारकाची निवड :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट
१ कलम १ ( ४ ) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा
म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत . अ ) ब ) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
भटक्या जमाती I क ) ड ) इ ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी फ ) ग )
निरधिसूचित जमाती ( विमुक्त जाती ) स्त्री – कर्ता असलेली कुटुंबे शारीरिकदृष्ट्या
विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे ह ) जमीन सुधारणांचे लाभार्थी आय ) इंदिरा
आवास योजनेखालील लाभार्थी
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : १ ) ७/१२ चा ऑनलाईन उतारा २ ) ८ अ
चा ऑनलाईन उतारा ३ ) जॉबकार्ड ची प्रत
0 Comments