Goat
Farming: शेळी
शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारी गोष्ट असून ग्रामीण भागामध्ये शेळीला गरीबाची गाय
देखील म्हटले जाते. ग्रामीण भागामध्ये बोकडाची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात
शेळी पालन करण्याकडे कल वाढत आहे.
भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु आजदेखील
शेतकऱ्यांच्या शेतीवर उदरनिर्वाह होत नाही. शेतकऱ्यावर आस्माने आणि नैसर्गिक संकट
मोठ्या प्रमाणात सारखे येत राहत असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसोबत शेळी
पालन हा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. या व्यवसायात करता सरकार ही पाठबळ देत आहे.
सकाळ घरामध्ये मोठ्या प्रमाणात बोकडाची मागणी वाढत असल्यामुळे शेतीला शेळी पालन हा
व्यवसाय हा जोडधंदा म्हणून मिळू शकतो.
Goat
Farming:काळाच्या
ओघात उत्पादनाच्यादृष्टीने शेतकऱ्यांचा कल ही जोड व्यवसायाकडे वाढत आहे. शिवाय हा
व्यवसाय शेती संबंधित असल्याने यामध्ये काही अडचण निर्माण होत नाही.शेतकऱ्यासाठी
ते सहज शक्य होत आहे.शिवाय तरुणांना देखील आपला एक व्यवसाय उभारण्यासाठी हा
सर्वोत्तम पर्याय आहे. त्याकरता 50 टक्के अनुदानही मिळते.मात्र त्यासाठी आवश्यक पद्धती माहिती असणे
आवश्यक आहे.
शेळीपालन अनुदान योजना महाराष्ट्र 2022 अंतर्गत
शासनाने मराठवाड्यच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद,यवतमाळ, गोंदिया आणि सातारा तसेच दुसऱ्या टप्प्यात
बीड,भंडारा या जिल्ह्यासाठी 20 शेळ्या
आणि दोन बोकड म्हणजे शेळीपालन अनुदान योजना 2022 महाराष्ट्र
साठी सरकारी अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून योजना राबवली जात
आहे.
व्यवसायासाठी
50 टक्के अनुदान
शेळी गटाची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्या सुरुवातीला दोन लाख 31 हजार 400 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये शेळ्या
साठी बंदिस्त वाड्याची उभारणी करावी लागणार आहे. शिवाय याची उभारणी ही शेतकऱ्यास
स्वतः करायची आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी हीच आठ असून याच्या 50 टक्के निधी हा शेळी वाड्याच्या उभारणीनंतर अनुदान स्वरुपात दिला जाणार
आहे.मात्र, याकरिता सर्व प्रकल्प उभा करून अनुदानाचे
प्रक्रिया करता येणार आहे.
20 शेळ्या,
2 बोकड योजना:
योजनेचे स्वरुप हे सरकारने ठरवून दिलेले आहे. या पद्धतीने शेळी आणि
बोकड यांची खरेदी केली तर हा व्यवसाय लहान स्वरूपात किंवा शेतकरायचे क्षमतेनुसार
सुरू करता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 20 शेळ्या सहा हजार
रुपये किमतीच्या तर दोन बोकडे आठ हजार रुपये किमतीचे खरेदी करावे लागणार आहेत.
म्हणजे एकूण एक लाख 36 हजारांची खरेदी करावे लागणार असून
अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना 68 हजार रुपये मिळणार आहे.
दर्शनासाठी गोटा 450 चौरस फुट बांधावे लागणार आहे. 212
चौरस फूट याप्रमाणे गोट्याला 95 हजार रुपये
खर्च येणार असून पैकी 47 हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना
अनुदान स्वरूपात मिळणार आहे. सदरच्या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या
पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा.
0 Comments