Sheli Palan Yojana Maharashtra 2022: शेळी/
मेंढी गट वाटप, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सन 2011-12 पासून कार्यान्वित असून या दोन्ही
योजनांतर्गत लाभ धारकांना लाभ देताना, शेळ्या-मेंढ्या तसेच
बोकड – नर मेंढा यांची संदर्भाधिन शासन निर्णयांमध्ये विहित केलेली किंमत आधारभूत
मानून त्यानुसार लाभ देण्यात येत आहेत.
परंतु, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा यांच्या
किंमतीत वेळोवेळी वाढ होत असल्याने, शासन निर्णयात विहित
दराने शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असून,
त्याबाबत लाभधारक तसेच लोकप्रतिनिधी कडून उक्त योजनांतर्गत दर
सुधारित करण्याची वारंवार मागणी करण्यात येत आहे.
त्यानुषंगाने राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजनेमध्ये एकरुपता
आणण्याच्या दृष्टीने राबविण्यात असलेल्या योजनांमधील शेळी मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी व आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना
वगळून शेळ्या/ मेंढ्यांचे सध्याचे बाजार मूल्य विचारात घेऊन, उक्त किंमतीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
योजनेचे नाव –
अंशतः
ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या / मेंढ्या व 1
बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप
करणे
टीप :-
· सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात
मध्ये राबवली जाणार नाही .
· योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि
मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड
यांचे गट वाटप करण्यात येतील.
· योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक
हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक
जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)
1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
2. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
3. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर
पर्येंतचे भूधारक)
4. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार
केंद्रात नोंद असलेले.)
5. महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील) Sheli
Palan Yojana Maharashtra
योजनेचे नाव – 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे
अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे
टीप :-
· योजनेअंतर्गत
पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या
शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
· योजनेअंतर्गत
कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि
उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात
येतील.
· लाभार्थी
निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
लाभार्थी निवडीचे निकष –
प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
1. दारिद्रय
रेषेखालील लाभार्थी
2. अत्यल्प
भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
3. अल्प
भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
4. सुशिक्षित
बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5. महिला
बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील) Sheli
Palan Yojana 2022
अ.क्र. |
गट |
प्रवर्ग |
एकूण
किंमत |
शासनाचे
अनुदान |
लाभार्थ्याचा
स्वहिस्सा |
1 |
शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी |
सर्वसाधारण |
१,०३,५४५/- |
५१,७७३/- |
५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती |
१,०३,५४५/- |
७७,६५९/- |
२५,८८६/- |
||
2 |
शेळी गट – अन्य स्थानिक जाती |
सर्वसाधारण |
७८,२३१/- |
३९,११६/- |
३९,११५/- |
अनु. जाती व जमाती |
७८,२३१/- |
५८,६७३/- |
१९,५५८/- |
||
3 |
मेंढी गट – माडग्याळ |
सर्वसाधारण |
१,२८,८५०/- |
६४,४२५/- |
६४,४२५/- |
अनु. जाती व जमाती |
१,२८,८५०/- |
९६,६३८/- |
३२,२१२/- |
||
४ |
दख्खनी व अन्य स्थानिक जाती |
सर्वसाधारण |
१,०३,५४५/- |
५१,७७३/- |
५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती |
१,०३,५४५/- |
७७,६५९/- |
२५,८८६/- |
0 Comments