जुनी विहीर दुरुस्ती योजना सुरु असा करा अर्ज



आजच्या लेखामध्ये जुनी विहीर दुरुस्ती योजना old well rehabilitation schemeसंदर्भात माहिती जाणून घेवूयात.या योजने अंतर्गत ज्या शेतकरी बांधवानी त्यांचे ऑनलाईन अर्ज केले होते त्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याबाबत कृषी विभागाकडून संदेश येण्यास सुरुवात झालेली आहे.

त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तुमची इच्छा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे.

या लेखाच्या सर्वात शेवटी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ दिलेला आहे तो नक्की पहा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यास अधिक मदत मिळेल.

विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मोफत हवी आहे का? मग आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

 

जुनी विहीर दुरुस्ती योजनेचा लाभ घ्या.

शेतीसाठी महत्वाचे म्हणजे पाणी. जर तुमच्याकडे विहीर असेल तर अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता. अनेक शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी विहीर असते. या विहिरीद्वारे पिकांना पाणी देण्याचे काम ते करतात.

बऱ्याच शेतकरी बांधवांकडे विहिरी असतात परंतु त्या नादुरुस्त नसल्याने शेताला पाणी देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जावू शकत नाही किंवा केला तरी त्याला खूप मर्यादा येतात परिणामी शेतातील उत्पादन कमी येते आणि यातून शेतकऱ्यांची जास्त प्रगती होत नाही.

अशा नादुरुस्त विहिरी दुरुस्त करावयाचे झाल्यास त्यासाठी खूप खर्च येतो. अशा विहीर दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते well grant or subsidy. या शासकीय अनुदानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतातील विहीर दुरुस्त करू शकता.

जुनी विहीर दुरुस्ती योजनेसाठी केवळ हेच शेतकरी पात्र

अनेक शेतकरी बांधवाना आता प्रश्न पडला असेल कि यासाठी अर्ज कसा करावा, कोठे करावा आणि अनुदान किती मिळते. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये माहिती करून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला देखील तुमच्या शेतातील विहीर दुरुस्त करता येईल.

जुनी विहीर दुरुस्ती अनुदानासाठी शासनाच्या mahadbt web portal वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

अर्ज करण्याआधी एक बाब या ठिकाणी लक्षात असू द्या कि ज्या व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असतील त्यांनाच mahadbt web portal वर जुनी विहीर दुरुस्ती करण्यासठी अर्ज करता येणार आहेत. तुम्ही जर सर्वसाधारण प्रवर्गातील असाल तर तुमच्या mahadbt dashboard ला अनुसूचित जाती व जमाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना हा पर्याय दिसणारच नाही.

तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील शेतकरी असाल तरच तुम्ही शासनाच्या जुनी विहीर दुरुस्ती अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

असा करा ऑनलाईन अर्ज

·         mahadbt web portal जा.

·         लॉगीन करा.

·         लॉगीन केल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.

·         अनुसूचित जाती व जमाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोर तुम्हाला बाबी निवडा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

·         तुमचा तालुका गाव जमिनीचा सर्व्हे नंबर अगोदरच या ठिकाणी तुम्हाला दिसेल.

·         मुख्य घटकामध्ये अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष घटक योजना हा पर्याय निवडा.

·         बाब या घटकामध्ये जुनी विहीर दुरुस्ती या पर्याय निवडा.

·         अटी आणि शर्थी पुढील चौकटीमध्ये टिक करा.

·         जतन करा या पर्यायावर क्लिक करा.

·         पहा या बटनावर क्लिक करा.

·         ज्या योजना तुम्ही या ठिकाणी निवडलेल्या असेल त्यांना प्रधान्य क्रमांक द्या.


·         ऑनलाईन अर्ज लिंक


·         अशा पद्धतीने तुम्ही जुनी विहीर दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्ही जर शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही अगदी सहजरित्या हा अर्ज करू शकता. हा अर्ज करण्यासठी तुमच्या आधारला मोबाईल लिंक असायला हवा. नसेल तर मात्र तुम्हाला जवळच्या csc सेंटरमध्ये जावे लागेल कारण त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने तुमच्या आधारची पडताळणी केली जाते.

विहीर दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज केला आता पुढे काय.

जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यासठी तुम्ही ऑनलाईन अर्ज तर केला आहे परंतु पुढे काय असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडलेला असेल. तर ती पण पद्धत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

एकदा का तुम्ही अर्ज केला तर तो छाननी अंतर्गत या पर्यायामध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजेच तुमचा अर्ज असा कृषी विभाच्या कृषी अधिकारी साहेबांच्या डेस्कला गेलेला आहे. कृषी अधिकारी साहेबांच्या तपासणीमध्ये सगळ्या बाबी योग्य असतील तर एक संदेश तुम्हाला येईल.

तुम्हाला असा संदेश येईल

तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर खालीलप्रमाणे एक संदेश येईल.



कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली जुनी विहीर दुरुस्ती घटकांसाठी निवड झाली असून अधिक तपशीलासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे व ७ दिवसात कागदपत्रे अपलोड करावे.

 

 

असा संदेश आल्यावर तुम्हाला परत एकदा लॉगीन करायचे आहे. लॉगीन केल्यानंतर या जुनी विहीर योजना संदर्भातील लागणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

 

जुनी विहीर दुरुस्ती योजना अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे

अर्ज सादर करतांना जी माहिती तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर नोंदविलेली आहे त्याप्रमाणे कागदपत्रे लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. हि कागदपत्रे कोणकोणत आहेत ते जाणून घेवूयात.

·         सातबारा.

·         एकूण जमिनीचा दाखला ८ अ.

·         तहसीलचे उत्पन्नाचे प्रमाण पत्र.

·         १०० रुपयाच्या बॉंड पेपरवर करारनामा.

·         स्वयं घोषणापत्र.


१०० रुपयाच्या बॉंड पेपरवर करारनामा कसा करावा लागतो त्याचा नमुना बघा.

वरील प्रमाणे कागदपत्रे यासाठी आवश्यक असतात. जुनी विहीर दुरुस्ती योजना तुम्हाला मंजूर झाली असेल तर यासाठी १०० रुपयाच्या बॉंड पेपरवर करारनामा कसा करावा लागतो. या करारनामावर काही साक्षीदारांच्या सह्या घ्याव्या लागतात. या करार नाम्याचा नमुना तुम्हाला बघायचा असेल तर हा नमुना तुम्ही बघू शकता त्यासाठी खालील करारनामा नमुना डाउनलोड करा या बटनावर क्लिक करा आणि हा करारनामा वाचून घ्या.

 


Post a Comment

0 Comments